
दैनिक स्थैर्य । 1 एप्रिल 2025। फलटण । विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भीम फेस्टिवल 2025 कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष श्रीमती स्वाती अहिवळे , बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भारत दादा अहिवळे, माळशिरस रिपाइंचे युवराज वाघमारे, विकास धाईजे, वैभव गीते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, मुन्ना शेख, राजू मारुडा, दत्ता अहिवळे, सतीश अहिवळे या कार्यकर्त्यांचा सनी संजय अहिवळे व गायिका कडूबाईताई खरात यांच्याहस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल त्यांचे भीम फेस्टिवलचे संग्राम अहिवळे, हरीश काकडे, विकी काकडे, दयानंद पडकर यांनी अभिनंदन केले.