
स्थैर्य, निंभोरे, दि. २२ सप्टेंबर : बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेल्या भीम आर्मी एकता संघटनेच्या वतीने ‘गाव तिथे शाखा’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या संकल्पनेअंतर्गत तालुक्यातील निंभोरे येथे संघटनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर वाघमारे यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ झाला.
यावेळी संघटनेचे जिल्हा उप-अध्यक्ष लक्षण काकडे, फलटण तालुका अध्यक्ष अजित मोरे, तालुका उप-अध्यक्ष सुनील पवार, जिल्हा कार्याध्यक्ष आदेश कांबळे, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री कांबळे, आणि तालुका संपर्क प्रमुख विजय कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात निंभोरे शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये संघटन शाखा प्रमुखपदी शरद रणवरे, तर शाखा अध्यक्षपदी रामभाऊ मदने यांची निवड करण्यात आली. यावेळी अक्षय सुर्यवंशी, संजय पोटकोडे, दिलीप मसुगडे, सुर्यकांत कांबळे, अर्जुन करडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जवळच असलेल्या प्रति-चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.