भिकोबा नगर होम मिनिस्टर २०२२ च्या विजेत्या प्रियांका जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील पणदरे भिकोबा नगर या ठिकाणी महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत शेता मध्ये कार्य करणाऱ्या व वाड्या वस्तीवरील परिसरातील महिलासाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून मनोरंजनाची संधी व विविध बक्षिसे जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली व महिलांच्या कला गुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले त्यामुळे सर्व सहभागी महिलांनी या महिला मंडळाचे व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ भिकोबा नगर व सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले व समाधान व्यक्त केले. गणेश उत्सव मध्ये सर्वच मंडळामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते परंतु शेतामधील, वाडी वस्त्यांवर राहणाऱ्या महिलासाठी शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ भिकोबा नगर येथील मंडळाच्या सहकार्याने महिला सभासद यांनी खास होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. “महिलांना चूल व मूल या प्रथे पलीकडे जाऊन ग्रामीण भागा मध्ये त्यांच्या मधील कला गुणांना व्यासपीठ निर्माण होणे साठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ” स्वरांजली जगताप,माधुरी जगताप, स्वाती जगताप व इतर सहकारी महिलांनी सांगितले. या प्रसंगी महिलांनी पर्यावरण, लेक वाचवा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, व्यसनमुक्ती, देशभक्ती आदी विषयावर उखाणे, म्हणी व छोटेसे मनोगत व्यक्त केले. महिला व मुलींनी विविध कार्यक्रमात भाग घेतला.

भिकोबा नगर होम मिनिस्टर 2022 च्या प्रथम विजेत्या प्रियांका जगताप, दुसरा क्रमांक नयना जगताप, तिसरा क्रमांक पूजाताई जगताप यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले तर प्रश्न मंजुषा मधील विजेत्यांना गृहपोयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले मंडळाचे तन्मय जगताप, सिद्धार्थ जगताप व पारस फडे यांनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले तर होम मिनिस्टर चे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले गायन सलीम सय्यद यांनी केले


Back to top button
Don`t copy text!