
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२३ | फलटण |
भाटघर धरण (ता. भोर, जि. पुणे) आज पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने विद्युत निर्मिती केंद्राद्वारे नदीपात्रामध्ये सकाळी ११.०० वाजता स्वयंचलित दरवाजातून २०० क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १६१४ क्यूसेक, असे एकूण १८१४ क्यूसेक विसर्ग सुरू झालेला आहे, अशी माहिती यो. स. भंडलकर सहाय्यक अभियंता, श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभाग, (नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी दिली आहे.
