दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । पुणे । पुणे भारती विद्यापीठअभिमत विश्व विद्यालय, परिचर्या महाविदयालय, पुणे. बी.एस्सी. (नर्सिंग) ३१ वा आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी प्रथम वर्षाचे विद्यार्थीचे २१ वा दीपप्रज्वलन सोहळा १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रामलिंग माळी, अध्यक्ष, महाराष्ट्र परिचार्य परिषद, मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि सन्माननीय अतिथी श्री. बापूराव गर्जे, आरोग्य शिक्षण अधिकारी, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे, महाराष्ट्र, तसेच डॉ. निलिमा भोरे, अधिष्ठाता, परिचर्या विद्याशाखा, भारती विद्यापीठ उपस्थित होत्या.
डॉ. भाग्यश्री जोगदेव प्रभारी प्राचार्या, भारती विद्यापीठ, परिचर्या महाविदयालय, पुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. मॉडर्न नर्सिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना स्मरूण विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुणे डॉ. रामलिंग माळी सर यांनी परिचर्या बनावट नोंदणींबद्दल जागरुकता निर्माण केली आणि त्यामुळे सर्व नोंदणीकृत परिचारिकांनी एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. तसेच परिचारिकांना मार्गदर्शन केले.
डॉ. निलिमा भोरे अधिष्ठाता, परिचर्या विद्याशाखा, यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आकलन आणि दृष्टीकोन प्रदान करणे आणि परिचर्या व्यवसायात त्यांना येणारी आव्हाने याबद्दल मूलभूत गोष्टी सांगून संबोधित केले. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट परिचर्या शिक्षण कौशल्यांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाविदयालयाची प्रगती हि त्याच्या वार्षिक अहवालातून कर्तृत्वाने ठळकपणे निदर्शनास आली. कार्यक्रमाला मान्यवर, पाहुणे आणि प्रेक्षकांनी विद्यार्थीचे भरभरुन कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अतीशय शिस्तबदध पद्धतीने पार पडला.