स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील राजाळे गावच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीचे नेते विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच म्हणून मारूतराव मोहिते यांची नुकतीच निवड झाली तर उपसरपंच म्हणून दादासो डोंबाळे व राजाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नारायणराव शेळके यांची निवड करण्यात आली. याबाबत राजे गटाकडून जनतेची दिशाभूल केली जात असुन राजाळे गावचे नूतन सरपंच मारुतराव मोहिते हे गत 25 वर्षापासून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर कार्यरत आहेत व ते भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांचे आणि माझे बोलणे झाल्यानंतर राजे गटाकडून तेथे भरण्यात आलेला सरपंच पदासाठीचा अर्ज आयत्यावेळी मागे घेण्यात आला, त्याबद्दल ते राजे गटाचे आभार मानण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर राजे गटाकडून सोशल मीडियावर मारुतराव मोहिते हे राजे गटाच्या वतीने सरपंच झाले असल्याबाबतचे बातम्या फिरू लागल्या. तरी ते भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते असून राजे गटाकडून दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू असल्याची खरमरीत टीका माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
राजाळे तालुका फलटण या गावच्या सरपंचपदी मारुतराव मोहिते तर उपसरपंच म्हणून दादासो डोंबाळे व राजाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नारायणराव शेडगे यांची निवड झाल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील राजभवन या निवासस्थानी त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवानेते नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांच्यासह फलटण पूर्व भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी अधिक बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मारुतराव मोहिते हे 25 वर्षांपासून माझ्यासोबत कार्यरत आहेत. त्यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त केले व बिनविरोध सरपंच झाले म्हणून त्यांनी राजे गटाचे पण आभार मानण्यासाठी गेले पाहिजे, असे स्पष्ट मत मी त्यांच्यापाशी व्यक्त केले व माझ्या सूचनेनुसारच ते राजे गटाचे आभार मानण्यासाठी श्रीमंत संजीवराजे यांच्याकडे गेलेले होते. तरी राजे गटाकडून ज्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत त्या पूर्णतः चुकीचे असून राजाळे गावचे सरपंच मारुतराव मोहिते हे भारतीय जनता पार्टीचे आहेत व भारतीय जनता पार्टीचे नेते विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजाळे गावचे सरपंच कार्यरत होते व राहणार आहेत.
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नानासाहेब ऊर्फ पिंटू इवरे म्हणाले की, फलटण तालुक्यातील राजाळे गावी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजाळे गावच्या सरपंचपदी मारुतराव मोहिते, उपसरपंचपदी दादासाहेब डोंबाळे व राजाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नारायणराव शेडगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करत, या पूर्वीप्रमाणे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मारुतराव मोहिते हे कार्यरत होते. तसेच यापुढेही ते कार्यरत राहतील व मारूतराव मोहिते हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते असून ते भारतीय जनता पार्टी बरोबरच कार्यरत राहतील, अशी खात्री सर्वांना आहे. तरी दिशाभूल करणाऱ्यांनी सच्चा कार्यकर्ता बद्दल दिशाभूल करू नये असे आवाहनही नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांनी केले.
यावेळी राजाळे गावचे नूतन सरपंच मारुतराव मोहिते हे म्हणाले की मी काही वर्षांपासून माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे व आताच्या सरपंच पदी मला बिनविरोध काम करण्याची संधी दिली म्हणून मी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या सरपंच पदाबद्दल आपला कसलाही संबंध नसून मी भारतीय जनता पार्टी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबतच होतो व कायम राहीन असे स्पष्ट केले.