फलटणमध्ये महायुतीचा धर्म आता भाजपा पाळणार नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2024 | फलटण | माढा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवत होते. निवडणूक लढवत असताना माढा लोकसभा मतदारसंघांमधील फलटण कोरेगाव विधानसभामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या गटाने महायुतीच्या विरोधात काम केल्यामुळे आगामी सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी फलटण शहर व तालुका महायुतीचा धर्म पाळणार नाहीत; याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली होती. त्यांना उमेदवारी घोषित करून सुद्धा महायुतीमध्ये असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम जाणून-बुजून न करता विरोधी असलेल्या उमेदवाराचे काम केलेले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्यातील कोणतेही पदाधिकारी व कार्यकर्ते हे महायुतीचे काम करणार नाहीत.

फलटण तालुक्यामध्ये आता यापुढे भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण ताकतीने लढवणार आहे. राज्यामध्ये जरी महायुती असली तरी यापुढे फलटण तालुक्यामध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधातच कार्यरत राहणार आहे.

– जयकुमार शिंदे,

जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, सातारा


Back to top button
Don`t copy text!