दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | २०१४ पूर्वी सुमारे ७० वर्षे ज्यांनी देशावर राज्य केले होते. त्यांच्या काळामध्ये देशाचे नाव जगामध्ये झाले नाही. परंतु २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेवर आली व भारत हा आता जगातील अग्रेसर देशांमध्ये गणला जात आहे. २०४७ साली जी आपली पिढी असेल ती पिढी अभिमानाने म्हणेल कि आमच्या पुर्वज्यांनी नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यानेच आज भारत हा विश्वविजेता देश आहे. भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सारख्या सर्वसाधारण नागरिकांची मतं हि “दान” म्हणून घेत नाही तर मतं हि “कर्ज” म्हणून घेत आहे; त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही सर्व जण झटत आहोत; असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
फलटण येथे “महाविजय २०२४; संपर्क से समर्थन” या अभियानाच्या अंतर्गत आयोजित सभेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, युवा नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आता खासदार रणजितसिंह यांना पुन्हा खासदार करण्यामध्ये कुणालाही अडचण नाही. खासदार रणजितसिंह यांनी संपूर्ण देशामध्ये सर्व खासदारांच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामकाज केले आहे. देशातील टॉप 10 खासदारांच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आहे. यासोबतच आमदार जयकुमार गोरे यांनी सुद्धा मंत्रालयाच्या 7 मजली इमारतीमध्ये असणाऱ्या प्रत्येक खात्यातून निधीवर दरोडा टाकला आहे. जर जयकुमार गोरे यांच्या नशिबात लाल दिवा असेल तर तो लांब होवू शकेल पण थांबवू शकणार नाही; असे सुद्धा बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत 45 खासदार हे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे असणार आहेत; असा विश्वास यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत ? मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे लोकांना प्रश्न विचारत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे; असे मत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी “मिशन 45” भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही फलटणमधून जाते; लाखो वारकरी ह्या मार्गावरून हजारो वर्षे जात आहे. यापूर्वी स्वतःला जाणते राजे म्हणवून घेणारे बारामतीकर कधीही वारकरी बांधवांचे दुःख समजू शकले नाही. ते दुःख नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांना कळले. निरा – देवधर धरण बांधून झालं परंतु काही भागाला पाणी वळवण्यासाठी निरा – देवधरचे पुढील कालव्याचे कामकाज प्रलंबित ठेवले. फलटणसह माढा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्याचे काम खासदार रणजितसिंह यांनी केले आहे असे मत व्यक्त करत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्यांपेक्षा जास्त डीपला जाऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे करत आहेत. आज फलटणमध्ये फिरत असताना बावनकुळे साहेब हे अगदी भाजी विक्रते असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो त्यांच्याशी संवाद साधत आहेत. असा प्रदेशाध्यक्ष पुन्हा मिळणे नाही. फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात भारतीय जनता पार्टीला यश आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेची तिकीट पुन्हा आपल्याला मिळावे अशी मागणी आहे. पण आज मी फलटणमधून आपल्याला आश्वस्त करतो की; मला तिकीट मिळाले नाही तरीही आगामी ग्रामपंचायत पासून ते अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत; असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
खासदाराला कशाला शहाणे करता ?; फलटणच्या माजी मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सवाल; आमदार जयकुमार गोरे यांचा आरोप
फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना सांगतात की; जलसंपदा विभागामध्ये असणारी जी माहिती आहे ती खासदाराला कशाला शहाणे करता ? त्यामुळे आम्ही काय केलं अशी आता सर्वसामान्य नागरिक विचारात आहे; असे प्रश्न फलटणचे माजी मंत्री जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना करत आहेत; असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या आयोजित “महाविजय 2024” सभेत केला.