विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार; दीपक चव्हाण व सचिन कांबळे – पाटलांच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण | राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज दि. २२ ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशित पत्र अर्थात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरु आहे. मंगळवार दि. २९ ऑक्टोबर पर्यंत आपले उमेदवारी अर्ज उमेदवार दाखल करू शकणार आहेत. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली प्रथम उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा लवकरच उमेदवारी यादी जाहीर करणार आहे. यामध्ये नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर होणार का ? याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिलेदार असलेले सचिन कांबळे – पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टी जाही करणार कि महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवणार याकडे सुद्धा संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!