दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | फलटण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्षा सौ. रत्नमाला भरत बेडके, माजी नगरसेवक भरत दत्ताजीराव बेडके व त्यांचे चिरंजीव अजिंक्य भरत बेडके यांचा आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला.
फलटण नगरपालिकेमध्ये सौ. रत्नमाला भरत बेडके यांनी उपनगराध्यक्षापदी व भरत दत्ताजीराव बेडके यांनी नगरसेवकपदी दहा वर्ष काम पाहिले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची फलटण शहरामध्ये राजकीय ताकद वाढली आहे.
भविष्यात भरत बेडके यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. याच पद्धतीने भविष्यात अनेक मान्यवरांचे भाजपामध्ये प्रवेश होताना दिसतील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.