भांबवली – वजराई धबधबा पर्यटकांसाठी खुला


दैनिक स्थैर्य । 1 जून 2025। सातारा । पर्यटकांचे लक्ष वेधणारा भारतातील सर्वाधिक उंचीचा भांबवली – वजराई धबधबा फेसाळला असून, पर्यटकांसाठी खुला होणार आहे, असे संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवलीकडून जाहीर करण्यात आले आहे.या धबधब्याची वैशिष्ट्ये म्हणजे भारतातील सर्वात उंच धबधबा, तीन टण्यात कोसळतो, तसेच श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या पदस्पशनि पावन झालेला हा धबधबा आहे. याला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून, पर्यटन विकास निधीतून त्या परिसराचा व पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे काम वन समितीच्या माध्यमातून सुरू आहे. दगडी पायवाट, वॉच टॉवर, पॅगोडा, पायर्‍या रेलिंग, बांबू हाऊस आदींची कामे झाली आहेत.

पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसात ओढ्यांना पूर येतो, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ओढ्यांवर लाकडी पूल बांधणे तसेच धबधब्याचा पॉइंट निसरडा असून, पर्यटकांच्या सुविधेसाठी बांबूची प्रेक्षागॅलरी बांधण्याबाबत वन खात्याने प्रस्ताव बनविलेला आहे. या मूलभूत सुविधा झाल्यावर हे पर्यटनस्थळ आकर्षणाचेकेंद्र होईल.गेली चार वर्षे प्रवेश शुल्क 50 रुपये प्रतिव्यक्ती होते, ते वाढवून 70 रुपये प्रतिव्यक्ती करण्यात आले आहे. धबधब्याचा मुख्य प्रवाह प्रचंड असल्याने पर्यटकांनी धबधबा पॉइंटवरूनच पाहावा, जवळ जाऊ नये, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले

यावर्षी मे महिन्यातच पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच मॉन्सूनही कधी नव्हे तो लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मे महिन्याच्या शेवटी धबधबे प्रवाहित झाले. त्यामुळे वजराई धबधब्याचा हंगाम जवळपास महिनाभर अगोदर सुरू झाला आहे.

गावात वयस्कर लोक राहात पर्यटनाचे नियोजन करतात. पर्यटकांना आवाहन आहे, की दारू पिऊन हुल्लडबाजी करू नये, शुल्क फी द्यावी, स्थानिकांशी हुज्जत घालून त्रास देऊ नये. शुल्क फीमधून सेवकांचे पगार निघून पर्यटकांना सुविधा देता येतात, त्यामुळे पर्यटकांनी शुल्क देण्याचे टाळू नये, सहकार्य करावे.

– रवींद्र बळीराम मोरे, पर्यटन प्रमुख भांबवली.


Back to top button
Don`t copy text!