श्रीराम कारखाना सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या आंदोलनस्थळी भजनाचा गजर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील सन 2017 ते 2020 या सालात सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅज्युइटीची रक्कम व्यवस्थापनाने अद्याप न दिल्यामुळे ती मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कामगारांनी अ‍ॅड.नरसिंह निकम यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकारगृहा बाहेर दिनांक 06 सप्टेंबर 2021 पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. आंदोलन सुरु होवून 15 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांकडून आंदोलनस्थळी भजन आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनस्थळी टाळ – मृदुगांचा गजर चांगलाच गरजत आहे.

या भजन आंदोलनाप्रसंगी नगरसेवक व भाजपा आध्यत्मिक आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव, अ‍ॅड.नरसिंह निकम, भजनी मंडळातील सदस्य व आंदोलक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!