
स्थैर्य, तरडगाव, दि. १३: तरडगाव ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा पाच पंच व पुजारी यांच्या उपस्थितीत देवाचा छबीना (वरात), महाआरती होउन संपन्न झाल्याची माहिती ग्रामदैवताचे पुजारी सुनील क्षिरसागर यांनी दिली आहे.
सालाबाद प्रमाणे या वर्षी तरडगाव ग्रामदेवत भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी न करता साध्यापध्दतीने संपन्न झाली. कोरोना महामारी संकटामुळे शासन प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करुन औपचारिकरित्या दि. ३ मे रोजी देवांचा विवाह सोहळा संपन्न झाला, त्या दिवसापासून यात्रेस प्रारंभ होतो या ८ दिवसात दैवतास विधीवत अभिषेक नेवैद्य जागर करत प्रतीपदेस दि.१२ मे रोजी महाअभिषेक करुन दैवतास अलंकार, संपुर्ण नववस्त्र परीधान करुन मंदीरात पाच पाऊल करुन देवाचा छबीना (वरात) काढण्यात आला.
अंबिकादेवी शिरवळची शासन काठी तुळजापूराहुन परत येताना तरडगावची यात्रा भरते परंतू कोरोना महामारीमुळे शासनकाठी शिवाय गेली दोन वर्षे यात्रा जुन्या अठवणींना ऊजाळादेत संपन्न होत आहे, त्यामुळे ग्रामस्थ व भक्त मंडळींमध्ये नाराजीचे वातावरण पहावयास मिळाले.