दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
‘तुमचा मोबाईल फ्रॉड प्रकरणात आहे, तुमची सेवा खंडित करण्यात येत आहे, तात्काळ आपण दोन दाबा व आमचे सर्व्हीस एजंटशी बोला, नाहीतर तुमचा नंबर ब्लॉक केला जाईल व तुमची सर्व मोबाईल सेवा बंद केली जाईल’, असा फ्रॉड मेसेज फोटोत दिलेल्या नंबरवरून येत असून हा ‘फ्रॉड कॉल’ आहे. हा ‘साइबर क्राइम’चा नवीन प्रकार आला आहे, तेव्हा त्यास रिस्पॉन्स करू नका, कॉल कट करा, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
वरील नंबरवरून आलेला ‘फ्रॉड कॉल’ हा स्वत: पोलीस निरीक्षकांनाच आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहून अशा कॉलला रिस्पॉन्स देऊ नये, असे फलटण शहरचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.