
दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत.
सदरील शुभेच्छा देताना छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा एकत्रित फोटो असून त्या फोटोच्या मागे “त्यांच्या नावाचा दरारा आहे की” हे गाण्याचे बोल आहेत.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस हा सातारा येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यातील विविध मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत.