बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा


स्थैर्य, मुंबई, दि.२५: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान बुद्धांचे अहिंसा, शांती, करुणा व उपेक्षितांची सेवा हे संस्कार भारतातील समाजमनावर शतकानुशतके रुजले आहेत. आज करोनामुळे जग आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना भगवान बुद्धांची व्यापक समाज हिताची शिकवण विशेष प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो व देश लवकर करोनामुक्त होवो अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!