फलटण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उत्तम उपचार : विजय घोलप


 

स्थैर्य, फलटण दि.१९: महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घातल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उत्तम उपचार केले जात असल्याचे, लहुशक्ती सेना फलटण तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय घोलप यांनी सांगितले.

बापुराव बाबुराव घोलप, वय 74 (रा.नागेश्‍वरनगर, चौधरवाडी, ता.फलटण) यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोवृद्ध असूनदेखील डॉ.व्यंकट धवन, डॉ.सुभाष गायकवाड, डॉ.विशाल दोशी यांच्या टिमने अतिशय उत्तम सेवा दिल्याने बापुराव घोलप हे कोरोनामुक्त झाले, असल्याचेही विजय घोलप यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!