दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सर्वोत्कृष्ट महिला स्टार्ट अप पुरस्कार सातारच्या सिद्धी सावंत यांना मिळाला असून राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार वितरीत करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी मान्यवर उपस्थित होते.
कु. सिद्धी सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांना दप्तराच्या वाढत्या वजनामुळे शारीरिक ठेवणीमध्ये होणाऱ्या त्रासापासून सुटका देण्यासाठी सेन्सर बेस्ड टेक्नॉलॉजीचा शालेय दप्तरांत वापर करण्याची नव संकल्पना तयार केली आहे.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक सिद्धी सावंत (शिक्षण), द्वितीय क्रमांक अमन पठाण (शिक्षण) व तृतीय क्रमांक जास्तीम शेख (आरोग्य/खाद्य प्रक्रीया) यांच्या नवकल्पनांची निवड करण्यात आली.