जुंगटीतील बेस्ट बस चालकाचा मुंबईत कोरोनाने मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 18 :  एक महिन्यापुर्वी नोकरीसाठी मुंबईत गेले अनं करोना ने त्यालाच  मृत्युदारी लोटल्याने जुंगटी ता. सातारा या गावातील एका 47 वर्षीय पुरुषाचा करोना मुळे मुंबईमध्ये मृत्यु झाल्याने गावासह परीसर शोकसागरात बुडाला असुन सर्वत्र दुःख व्यक्त होत असतानाच ऊदरनिर्वाहासाठी शहरात जाणाया चाकरमान्यांमध्ये करोना ची धडकी भरू लागली आहे. मरणांच्या ठायी जातो आपल्या पायी या म्हणी प्रमाणे जुंगटी गावातील 47 वर्षिय पुरुष मुंबई मधील बेस्ट बस चालक तुकाराम कोंडीबा कोकरे हे मार्चमध्ये झालेल्या करोना च्या पहिल्या लॉकडाऊन वेळी आपल्या कुंटुंबासमवेत गावात दाखल झाले होते गावात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते तिन महिने  रमले होते अनं त्यांना करोना चा मुंबईतील आकडा पाहुन आपली करोना पासुन सुटका झाली असे वाटत असतानांच बेस्ट बसच्या परिवहनविभागाने कामावर हजर राहण्याचा तगादा लावल्याने नोटीसी पाठवल्याने त्यांना अखेर करोना मुळे आपल्या कुंटुबाला गावीच सोडुन मुंबई मध्ये बेस्ट बस चालवण्यासाठी  कामावर हजर राहवे लागले आणी ते पंचवीस दिवसापुर्वी नोकरीवर हजरही झाले ते खेतवाडीतील स्वताच्या खोलीवर राहत होते मात्र त्यांना नोकरीवर असताना करोना ची लागण झाली आणी त्यांना त्रास जाणवु लागल्याने  पाच दिवसापुर्वि ऊपचारासाठी मुंबईमध्ये रूग्णालयात दाखल केले होते उपचारा दरम्यान त्यांचा करोना आजाराने मृत्यु झाल्याची वार्ता गुरुवारी रात्री  जुंगटी गावात समजताच त्यांची पत्नी दोन मुले आई वडील भाऊ यांसह कुंटुंबीय गाव व परिसर शोकसागरात बुडाला असुन एक  हसतमुख व्यक्तीमत्व  हरपल्याने जनतेतुन हळहळ व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!