जिल्ह्यातील 134 बालकांना संगोपन योजनेचा लाभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुन २०२१ । सोलापूर कोविडमुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी दिली आहे.

कोविड साथीत पालक गमावलेल्या बालकांचे योग्यरित्या संगोपन आणि देखभाल केली जावी यासाठी राज्‍य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृतीदल स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाच्या आढावा बैठका श्री. शंभरकर यांनी घेतल्या असून कोविडमुळे दोन्ही अथवा एक पालक गमावलेल्या बालकांचे संगोपन योग्यरित्या व्हावे याकडे लक्ष देण्याच्या महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत.

श्री. खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 21 आहे. या सर्व बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कोविड-19 मुळे एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 552 आहे. त्यापैकी 225 बालकांची सामाजिक चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी 113 बालकांना संगोपन योजनेचा लाभ मंजूर केला आहे. कोविड मुळे पती गमावलेल्या महिलांची संख्या 498 आहे.

बालसंगोपन योजना – ज्या बालकांचे आई किंवा वडील किंवा दोन्ही मयत झाले असतील किंवा कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांची बालके किंवा ज्या बालकांचे आई वडील शिक्षा भोगत असतील अशा बालकांना मुलभूत गरजा, शिक्षण यासाठी योजनेचा लाभ दिला जातो. लाभार्थी अनुदान प्रति महिना प्रति लाभार्थी 1100 रुपये दिले जाते.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्लॉट नं. 1608/09, शोभा नगर, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक (0217) 2310671.

कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या बालक व महिलांसंबंधी अडचणीबाबत संपर्क :- डॉ. विजय खोमणे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सोलापूर – 8605453793, श्रीमती अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बाल कल्याण समिती, सोलापूर – 9423330401, श्री. दिपक धायगुडे, परिविक्षा अधिकारी, सोलापूर – 7387267922.


Back to top button
Don`t copy text!