सातारा पालिकेच्या 36 कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ; आस्थापना विभागाकडून वेतन निश्‍चितीचे काम अंतिम 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.१: तब्बल अठरा वर्षापासून आस्थापनेवर येण्यासाठी झगडणार्‍या छत्तीस कर्मचार्‍यांना तब्बल चार वर्षापासून रखडलेल्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला आहे. आस्थापना विभागाने वेतन निश्‍चिती करून याच महिन्यात वाढीव वेतन देण्याचे संकेत दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

छत्तीस कर्मचार्‍यांनी गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेऊन त्यांना मनापासून धन्यवाद दिले. पेढे भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक दत्तात्रय बनकर, व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे पुष्पगुच्छ व पेढे देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले. कायम आस्थापना विषयाचा या कर्मचार्‍यांचा कामगार न्यायालयात अद्यापही लढा सुरू आहे. 2016 मध्ये तत्कालीन नगरविकास राज्य मंत्र्यांनी कर्मचार्‍यांच्या पदरचनेच्या अपिलाला अंशतः मान्यता दिली होती. मात्र, तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कर्मचार्‍यांनी आस्थापनेची पत्रे दिली. मात्र वेतन निश्‍चितीचा लाभ दिला नाही. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी 23 जुलै रोजी पदभार स्वीकारताच 36 कर्मचार्‍यांच्या वेतन निश्‍चितीच्या कामाला गती येऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. कर्मचार्‍यांना पाचव्या वेतन आयोगा प्रमाणे 3050-4590 वेतनश्रेणी लागू झाली होती. आता त्यांना 19900-63200 ही वेतन श्रेणी लागू झाली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याच्या पगारात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!