राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण योजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी 16 जानेवारी पर्यंत कागदपत्रे अपलोड करावी


दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । सातारा । नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे. (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह), अशा लाभार्थ्यांनी दि. 12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) ते दि. 16 जानेवारी 2022 ( रात्री 12.00 वा. पर्यंत) या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.

निवड झालेल्या (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि. 16 जानेवारी 12.00 वा. पर्यंत या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करण्याविषयी संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https://ah.mahabms.com, अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH-MAHABMS ( google play store) यावर कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.


Back to top button
Don`t copy text!