
दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२२ । गोखळी । तालुक्यातील गोखळी येथील आरोग्य उपकेंद्र अंतर्गत पल्स पोलिओ लसीकरणास लाभार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. भारत पोलिओमुक्त झाला असला तरी शेजारी राष्ट्रांमध्ये अध्याप पोलिओग्रस्त रुग्णांचे मध्ये वाढ होत आहे. तो पुन्हा येऊ शकतो म्हणून आपल्या बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने ही मोहीम २७ फेब्रुवारी रोजी राबविल्याचे आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया शेख यांनी सांगितले.
गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत गोखळी, घाडगेवस्ती, पंचबिघा, साठे फाटा, साठे, खटकेवस्ती व गवळीनगर येथे लसिकरण झाले. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात ऊस तोड सुरू असून ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना व विटभट्टीवर काम करणार्या कामगारांच्या ३८ मुलांना वीट भट्टी वर जाऊन जाऊन पोलिओ डोस देण्यात आले.
आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया शेख तसेच आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स दुर्गा आडके, घाडगे, दणाणे, वायाळ, नामदास, साळुंखे, बागाव यांनी परिश्रम घेतले.