
स्थैर्य, फलटण, दि. 15 नोव्हेंबर : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दिव्यांग लाभार्थीना यापूर्वी 1500/- इतके अनुदान दिले जात होते. शासननिर्णयानुसार आक्टोंबर 2025 पासून दिव्यांग लाभार्थीचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500/- वरून दरमहा रुपये 2500/- करण्यास शासन मान्यता देण्यात येत आलेली आहे. पेन्शन यादीतील लाभ दिव्यांग लाभार्थीना मिळणेसाठी ऊइढ (ऊळीशलीं इशपशषळलळरीू ढीरपीषशी) गध्ये युडीआयडी कार्डचा नंबर नमुद करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या पेन्शन वाढीचा लाभ दिव्यांग लाभार्थीना मिळणार नाही, तहसील डॉ. अभिजित जाधव यांंनी दिली.
तहसील डॉ. अभिजित जाधव म्हणाले, फलटण तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनामधून लाभ घेत असलेल्या दिव्यांग लाभार्थीनी ज्या दिव्यांग लाभार्थीकडे यूडीआयडी कार्य आहे. अशा दिव्यांग लानार्थीनी युडीआयडी कार्डचा नंबर डीबीटी मध्ये नमुद करणेसाठी युडीआयडी कार्डची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत संजय गांधी शाखे मध्ये जमा करावी.
तसेच ज्या दिव्यांग लाभार्थींनी अद्याप युडीआयडी कार्ड काढलेले नाही अशा दिव्यांग लाभार्थनी जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी दिलेल्या खालील वेळापत्रकानुसार व मैत्र असणार्या दिव्यांग लाभार्थी यांनी उपजिल्हा रुग्णालय फलटण ओपीडी या ठिकाणी व इतर दिव्यांग लाभार्थीनी जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी नेमून दिलेल्या ठिकाणी वाराच्या दिवशी व वेळेत उपस्थित राहून तात्काळ युडीआयडी कार्ड काढून घेणेचे आहे, असे फलटण तहसील कार्यालय व संजय गांधी शाखेने आवाहन केले आहे.
