अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार चणाडाळ मोफत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि.27 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर 2020 कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह एक किलो चणाडाळ मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.

सुधारित इष्टांकानुसार सोलापूर शहरासाठी जुलै ते नोव्हेंबर 2020 साठी 490 मेट्रीक टन चणाडाळ उपलब्ध होणार आहे. अ विभागासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबासाठी 671.60 क्विंटल, ब विभागासाठी-1156.50 क्विंटल, क विभागासाठी 1933.60 क्विंटल आणि ड विभागासाठी 1092.80 क्विंटल चणाडाळ उपलब्ध होणार आहे. रास्त भाव दुकानदारांनी चणाडाळीचे वाटप ई-पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक आहे. कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची परिमंडळ अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ई-पॉस उपकरणे हाताळण्यापूर्वी लाभार्थ्याने साबणाने हात स्वच्छ धुवावेत, दुकानाबाहेरच साबण/सॅनिटायझरची व्यवस्था करावी, रास्त भाव दुकानात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पाटील यांनी केल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!