
दैनिक स्थैर्य । दि. १५ एप्रिल २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यात वाटप होत असलेल्या आनंदाचा शिधा हा चांगल्या पध्दतीने तसेच चांगल्या प्रतीचा मिळत असल्याबद्दल टेटली गावचे सरपंच रामचंद्र धोंडीबा भोसले यांनी समाधान व्यक्त केले व मुख्यमंत्री महोदयांना या बद्दल धन्यवाद दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आनंदाचा शिधाचे व शिवभोजन थाळीचे लाभार्थी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी सातारा जिल्ह्यातील टेटली गावचे सरपंच रामचंद्र धोंडीबा भोसले व साताऱ्यातील रत्नप्रभा महादेव आगवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संवाद साधला.
तहसिल कार्यालय सातारा येथिल शिवभोजन केंद्रामध्ये शिवभोजन लाभ घेणाऱ्या श्रीमती आगवणे म्हणाल्या, या केंद्रामध्ये चांगल्या पध्दतीचे जेवण मिळते. भात, भाजी, चपाती असे सर्व जेवण मिळते. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.