स्थैर्य, सातारा, दि. २७ : महाराष्ट्रात विविध सण साजरे केले जातात. आषाढ शु. 14 मूळ नक्षत्रा दिवशी साजरा केला जाणारा बेंदूर सण अवघ्या सात-आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कुंभारवाड्यात या सणाची लगबग सुरु आहे.
महाराष्ट्रात बेंदूर सणाला मोठं महत्त्व आहे. गुढीपाडव्यानंतर महाराष्ट्रीयन सणाची सुरुवात बेंदूर या सणापासून होते. ग्रामीण भागात हा सण पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. त्याप्रमाणेच शहरी भागातही हा उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोविड 19 च्या प्रादुर्भावाने विविध सण साध्या पध्दतीने घरगुती साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या सणामध्ये बैलांना फार महत्त्व असते. ग्रामीण भागात बैलांची पूजा केली जाते. शहरी भागात शाडू मातीपासून बनविलेल्या बैलजोडीची पूजा करतात. या सणाच्या तयारीसाठी कुंभारवाड्यात बैलजोड्या बनविण्याची लगबग सुरु आहे.