जीवनाच्या वाटेवरती पुढं जाण्यासाठी मेहनत , कष्ट , शुद्ध आचरण ,प्रामाणिकपणा ,संस्कार यांची सांगड असणे गरजेचे आहे.त्याच बरोबर नम्रपणे झुकणे कवा भी भारीच. झुकणे याचा अर्थ आत्मसन्मान घालविणे हा होत नाही.प्रत्येक किमती वस्तू उचलण्यासाठी झुकावेच लागते. वडीलधाराऱ्यांचे आशीर्वाद त्याचपैकी एक आहेत.झुकण्याने कमीपणा येत नसून प्रगतीपथावर जाता येत.आत्मसन्मान, मानसन्मान , मोठेपणा मिळतो.किंमतीवान गोष्ट प्राप्त करणे केवळ झुकण्यामुळेच शक्य होती.आपल्यातील चांगुलपणाचे प्रतिक हे झुकणे आहे.पुढे जाण्यासाठी मागे खचण्या परीस लव्हाळे सारखं झुकल्यास असाध्य साध्य होते.
मंदिरात भगवंताचे दर्शन घेताना झुकणे हे चरण पासून मुख कमला पर्यंतचा सुखकार प्रवास आहे.मनुष्य देह खरं तर झुकायला तयार होत नाही.अंतरंगातील विकार त्याला आड येतात. ज्ञानी होण्याचा सर्वात चांगला उपाय मंजे झुकणे.चुकले तर झुकावे.ज्येष्ठांसमोर झुकावे. प्रसंगी लहानग्याजवळ झुकावे.पशु मात्रांना गोंजरावे.वेलींना कवटाळावे.झुकलेला जिथून लहानांचा मोठा झाला तिथंच नतमस्तक होतो.सन्मान मिळवण्यासाठी पद पैसा प्रतिष्ठा वशीला याची खरंच गरज नसते.फक्त अंगी नम्रता व झुकण्याची आवश्यकता हवी.
आज तरूणाईने मोठेपणा प्राप्त करण्यासाठी चुकीचा मार्ग न अवलंबिता झुकण्याचा मार्ग निवडावा.सळसळते तारूण्य बहरण्यासाठी झुकणे हाच अलंकार रुपी दागिणा आहे.झुकलेला मोडत नाही.पराजित होत नाही.मागे हटत नाही.जाग्यावर थांबत नाही.तर पुढं जाण्यास झुकण्याच्या गुणांमुळे अनेकजण मदतच करतात. झुकण्याने खानदानाचे संस्कार कळतात.फळांनी लगडलेले झाड झुकण्यानेच सर्वांना आपलेसे वाटते.मोत्यासारखे दाण्यांने भरलेले कणीस सुद्धा लोभस व मोहक वाटते.ज्येष्ठां समोर नुसतं वाकून चरण स्पर्श केल्यास मिळणारा लाखमोलाचा आशीर्वाद मूल्यमापनाच्या पलिकडचा असतो.मला तर झुकणे जमत नव्हते.पण तुमच्या सारख्या महनिय वंदनिय व्यक्तीमत्वाने झुकण्यातच आत्मसन्मान आहे.ही शिकवण दिल्याने मी त्या मार्गावर आहे.