अस्थिरतेमुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये उदासीनता
स्थैर्य, मुंबई, ५ : भारतीय बाजाराने इंड्रा डेमधील नफा गमावला आणि अस्थिरतेमुळे आजच्या व्यापारी सत्रात उदासीन व्यवहार दर्शवला. निफ्टी ०.०६% किंवा ६.४०% नी वाढला आणि ११,१०१.६५ अंकांवर स्थिरावला. म्हणजेच तो ११,१०० च्या पातळीपुढेच राहिला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स मात्र ०.०७% किंवा २४.५८ अंकांनी घसरला व ३७,६६३.३३ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ९९४ शेअर्स घसरले, १६११ शेअर्सनी नफा कमावला तर १५२ शेअर्स स्थिर राहिले. हिंडाल्को इंडस्ट्रिज (९.०९%), टाटा स्टील (६.७०%), आयशर मोटर्स (४.८२%), अदानी पोर्ट्स (३.८३%), आणि टाटा मोटर्स (३.६८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर युपीएल (१.४५%), एचडीएफसी लाइफ (१.४८%), पॉवर ग्रिड कॉर्प (०.९८%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.८६%) आणि एचडीएफसी बँक (१.०३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. क्षेत्रीय आकडेवारी पाहता, धातू, वाहन, इन्फ्रा आणि आयटी क्षेत्र नफ्यात राहिले तर ऊर्जा आणि औषध क्षेत्रानी तोटा दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.४६% नी वधारले आणि बीएसई स्मॉलकॅपनी ०.९१% ची वृद्धी दर्शवली.
पनामा पेट्रोकेम : कंपनीचा २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहितील निव्वळ नफा ५०.६% नी घसरला तर या काळातील महसूल ४०.८% नी घसरला. तथापि, कंपनीचे स्टॉक्स २.८५% नी वधारले व त्यांनी ४१.५० रुपयांवर व्यापार केला.
फोर्स मोटर्स : फोर्स मोटर्सचा जुलै महिन्यातील एकूण विक्री ५५.७% नी घसरली. ती २,५५१ युनिटवरून १,१२९ युनिटपर्यंत आली. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे स्टॉक्स २.७६% नी वाढले व त्यांनी ९४०.०० रुपयांवर व्यापार केला.
अॅक्सिस बँक लिमिटेड : अॅक्सिस बँकेने १०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी क्यूआयपी किंवा क्लालिफाइड इस्टिट्यूशनल प्लेसमेंट लाँच केले. परिणामी बँकेचे स्टॉक्स १.१८% नी वधारले व त्यांनी ४३४.२० रुपयांवर व्यापार केला.
सन फार्मा अॅडव्हान्स्ड रिसर्च कंपनी लिमिटेड : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत सर्वाधिक कमाई झाल्याची नोंद केली. कंपनीने ५६.६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला तर कामकाजातून १८५.४५ कोटी रुपयांचा महसूल कमावला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ६.६४% नी वाढले व त्यांनी १८६.४० रुपयांवर व्यापार केला.
लुपिन लिमिटेड : या फार्मा कंपनीने कोव्हिहॉल्ट या ब्रँड नावाने भारतात फेव्हिपिरावीर लाँच केले. हे औषध सौम्य ते मध्य स्वरुपातील कोव्हिड-१९ संसर्गावर उपचारांसाठी वापरले जाऊ शकते. तथापि, कंपनीचे स्टॉक्स १.३६% नी घसरले व त्यांनी ९२८.०० रुपयांवर व्यापार केला.
पीआय इंडस्ट्रिज : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ एकत्रित नफ्यात ४३% ची वाढ झाल्याचे तसेच कंपनीचा महसूल ४०% नी वाढल्याचे नोंदवले. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.५६% नी वाढले व त्यांनी १,८९९.९५ रुपयांवर व्यापार केला.
इआयडी पॅरी : २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित महसुलात ३२.५% ची वाढ झाली. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफाही २९.३ कोटी रुपये झाला. तरीही ईआयडी पॅरीचे स्टॉक्स ३.६५% नी घसरले व त्यांनी २९४.०० रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया : सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटमुळे भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.८८ रुपये एवढे उच्चांकी मूल्य कमावले.
सोने : आजच्या व्यापारी सत्रात सोन्याने एमसीएक्सवर सोन्याने ५४,७०० रुपयाचे नवे उच्चांकी मूल्य गाठले. इंटरनॅशनल स्पॉट किंमतीत वाढ आणि डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात ही वाढ दिसून आली.
जागतिक बाजारात सकारात्मक संकेत : आजच्या व्यापारी सत्रात जागतिक बाजाराने उच्चांकी कामगिरी केली. प्रोत्साहनपर पॅकेजेसमुळे अमेरिकी बाजार उच्चांकी स्थितीत बंद झाला. नॅसडॅकने ०.३५% ची वृद्धी घेतली, एफटीएसई एमआयबीत ०.४६% ची वाढ झाली, एफटीएसई १०० चे शेअर्सही ०.९६% नी वाढले. हँग सेंगचे शेअर्स ०.६२% नी वाढले तर निक्केई २२५% चे शेअर्स ०.२६% नी घसरले.