दैनिक स्थैर्य | दि. 04 ऑगस्ट 2024 | पुणे | राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांमध्ये कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.
अनेक महिलांनी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक खाते क्रमांक, रहिवासी पुरावा, हमीपत्र, पराज्यातील रहिवासी पुरावा किंवा लग्नानंतर निवासाचा पुरावा, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण किंवा अस्पष्ट भरली आहेत. या कारणामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
ज्या महिलांना अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची एकच संधी देण्यात आली आहे. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दुरुस्त करून शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत किंवा ज्या मोबाइल क्रमांकावर अर्ज भरला होता त्या क्रमांकाच्या माध्यमातून पाठवावेत.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
अर्ज रिजेक्ट झालेल्या महिलांना त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवून याबाबत माहिती देण्यात येत आहे. या मेसेजमध्ये अर्ज रिजेक्ट झाल्याचे कारण स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे महिलांना कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत हे सहजपणे समजू शकते. त्यांनी या संधीचा फायदा उठवून आपले अर्ज दुरुस्त करावेत. यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल.