दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । बेल्स पाल्सी म्हणजे अर्ध्या चेहर्यावरून वारे जाणे. या आजारात चेहर्याच्या अर्ध्या भागातल्या स्नायूंची शक्ती काही काळासाठी नष्ट होऊन त्यांचे आकुंचन-प्रसरण थांबते आणि ते लुळे पडतात. क्वचितप्रसंगी चेहर्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात. परंतु, या स्नायूंवर तात्पुरता परिणाम होतो, आणि उपचार केल्यावर ते पूर्णपणे बरे होते.
मेंदूमधून एकूण 12 विशेष मज्जातंतू निघतात. त्यांना क्रेनिअर नव्र्हस म्हणतात. यातील सातव्या क्रमांकाच्या मज्जातंतूंना फेशियल नव्र्ह म्हणतात. मेंदूपासून डोक्याच्या कवटीबाहेर आल्यावर या फेशियल नव्र्हला पाच शाखा फुटतात. त्या कपाळ, भुवया, पापण्या, वरचा आणि खालचा ओठ, गाल, कानाच्या पुढील भाग, मानेचा एका बाजूचा भाग यावरील स्नायूंची हालचाल नियंत्रित करत असतात. या मज्जातंतूला इजा झाल्याने या स्नायूंच्या हालचाली बंद होतात.
मुख्य चिन्हे आणि लक्षणे खबेल्स पाल्सिमुळे चेहर्याचा एका बाजूच्या स्नायूंवर परिणाम होतो. सुमारे 1%लोकांमध्ये दोन्ही बाजूंवर परिणाम होतो. चेहर्याच्या हालचाली नियंत्रित करणार्या नसांवर परिणाम होतो. ज्या बाजूंवर परिणाम झाला आहे. त्या बाजूने तोंड उघडण्यास, हसण्यास आणि चावण्यास त्रास होतो.चेहर्याच्या ज्या बाजूवर परिणाम झाला आहे. तिथे दुखू शकतं, मुख्यतः जबडा व डोक्यामध्ये.स्नायू अशक्त झाल्यामुळे, डोळ्याच्या पाप्न्याखाली झुकतात आणि तोंडातून लाळ गळते. जिभेच्या पुढील भागाने चव ओळखता येत नाही. चेहर्याच्या एका बाजूचे स्नायू लोंबू लागतात, त्यामुळे दोन्ही बाजू असमान दिसतात.चेहरा भावनारहित दिसतो. चेहर्यावरचे स्नायू मध्येच आखडतात आणि फडफडतात. खाणे पिणे अशक्य होते.बोलणे स्पष्ट न राहता अडखळत होते. जिभेची चव पूर्णपणे किंवा अर्धवटपणे नष्ट होते.कानामध्ये वेदना होतात.उच्च पट्टीतल्या आवाजाचा त्रास होतो. डोळ्याच्या पापणीची उघडझाप बंद होते.डोळा कोरडा पडतो. आजाराची सुरुवात झाल्यावर ही लक्षणे लगेच दिसू लागतात आणि दोन दिवसांत ती वेगाने वाढतात.
याची मुख्य कारणे – बेल्स पाल्सी 5 ते 60 वर्षांपर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. दर 5000 व्यक्तींत एकाला हा आजार होऊ शकतो. बेल्स पाल्सी एकदा झाली तरी ती पुन्हा होऊ शकतो. बेल्स पाल्सी होण्याचे खरे कारण वैद्यकीय शास्त्राला स्पष्टपणे माहिती नाही. मात्र काही विषाणूजन्य संसर्गामुळे फेशियल नव्र्हला सूज येते, ती फुगते आणि कवटीच्या ज्या छिद्रातून ती बाहेर येते, त्या हाडामध्ये ती दबली जाते. या दबावामुळे फेशियल नर्व्हचे कार्य थांबते.कानाची किंवा चेहर्याची वा त्याच्या आसपासची शस्त्रक्रिया करताना फेशल नार्व्सला इजा पोहोचते तेव्हा देखी बेल्स पाल्सी होण्याची शक्यता असते.
या रोगाचे काही रिस्क फॅक्टर असे आहेत.
मधुमेह, गर्भावस्था, विशेषतः शेवटचे तीन महिने. जर कुटुंबात हा रोग आधी कोणाला झाला असेल तर.चेहर्याच्या नसांना झालेल्या कुटलीही दुखापत, सूज किंवा नुकसान यामुये सुधा बेल्स पाल्सी होऊ शकतो.
निदान आणि उपचार – बेल्स पाल्सीचे निदान रुग्णाच्या वैद्यकीय तपासणीतूनच होते. रुग्णाची लक्षणे लक्षात आल्यावर डॉक्टर त्याला दोन्ही डोळे घट्ट आवळून घ्यायला सांगतात, त्यामध्ये ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूचा डोळा उघडा राहतो. तपासण्यांमध्ये डॉक्टर रुग्णाला गाल फुगवायला सांगतात, ओठांचा चंबू करायला सांगतात, ओठ फाकवून दात दाखवायला सांगतात, कपाळाला आठया पाडायला सांगतात. या क्रिया करताना रुग्णाच्या चेहर्याच्या ज्या बाजूला त्रास झाला आहे, त्या बाजूच्या स्नायूंची हालचाल होत नाही. यावरून बेल्स पाल्सीचे निदान होते.
फेशियल नर्व्हला कितपत इजा झाली आहे, हे पाहण्यासाठी ईएमजी हा मज्जातंतूतील विद्युतप्रवाहाचे मापन करणारा आलेख काढला जातो.निदान हे शारीरिक तपासणी, इमेजिंग आणि ब्लड टेस्ट द्वारे केले जातात. रोगाचे लक्षणं बघून डॉक्टर चेहरा तपासतात, आणि डोळ्यांच्या पापण्या झुकल्या आहेत का, तोंडातून लाळ गळते का हे बघतात. एमआरआय किंवा सिटी स्कॅन सारख्या इमेजिंग तंत्राच्या सहाय्याने चेहर्याचे स्नायू तपासले जातात.जर व्हायरल इन्फेक्शन झाल्यासारखे वाटत असेल, तर डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात. स्ट्रोक, लाईम रोग आणि ब्रेन ट्युमर सारखे इतर रोग वगळून निदान करण्यात येते. बेल्स पाल्सी चे उपचार हे रोगाची कारणे आणि रिस्क फॅक्टर वर खूप अवलंबून आहे. फिजिओथेरपी उपचारामध्ये नर्व्हस्टीमुलेशन आणि लेझर 4_ क्लास आणि चेहर्याच्या ट्यांपिंग उपचाराने आणि योग्य औषधांच्या उपचाराने शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. 15 दिवस ते एक महिन्यांमध्ये हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. पुन्हा केव्हाही हा आजार न होण्यासाठी फिजिओथेरपी खूप चांगले कार्य करते.
आम्ही डॉ. अकोलकर यांच्या अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिकमध्ये तुम्हाला आमच्या कडील कौशल्याचा आणि मशिनरीजचा वापर करून शस्त्रक्रियामुक्त अशी उपचारपद्धती देऊन पुढील काही काळामध्ये तुम्हाला ह्या असहाय्य वेदनांपासून मुक्त_ करतो.
डॉक्टरांची_वैशिष्टे- डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणार्या ऋखऋ- थजठङऊ उणझ 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ डॉक्टर आहेत. डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण. डॉ अकोलकरस फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणार्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात. जर्मनी टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर उपकरणे ह्या आणि अश्या अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.
अधिक माहिती आणि संपर्कासाठी डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ दु.2:00 ते 6:00 पर्यंत. साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (एस. टी. स्टँडच्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत..तांबे कमरशिअल कॉम्प्लेक्स, सुभद्रा मॉल जवळ भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 पर्यंत.तसेच डॉ ढोले कॉम्प्लेक्स मदनवाडी चौफुला पुणे सोलापूर हायवे भिगवण, वेळ स.9:00 ते 11:30 पर्यंत येथे आणि 7350069955 या मोबाईल _नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.