सोनवडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही; निरा-देवघरच्या पाण्याने शेतकरी समृद्ध होईल : माजी खासदार रणजितसिंह


स्थैर्य, सोनवडी, दि. ०७ सप्टेंबर : “गेली तीस वर्षे विकासापासून वंचित असलेल्या फलटण तालुक्यात आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे. ही बाब जनतेला आणि युवकांना समजू लागल्याने, ते विकासकामांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत,” असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोनवडी येथे आयोजित कार्यक्रमात शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “सोनवडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. हे गाव एमआयडीसीच्या रस्त्यावर असल्याने या गावाला विशेष महत्त्व प्राप्त होऊन युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. लवकरच निरा-देवघरचे पाणी या भागात येणार असून, त्यामुळे प्रत्येक शेतकरी समृद्ध होईल.” आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या भागाने भाजपच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, संतकृपा उद्योग समूहाचे चेअरमन विलासराव नलवडे, भाजपा मंडल अध्यक्ष लक्ष्मण सोनवलकर, कोळकीचे माजी उपसरपंच संजय देशमुख, माजी उपसरपंच विकास नाळे, माजी सदस्य उदयसिंह निंबाळकर, सोनवडीचे सरपंच बाळासाहेब शिंदे, युवा नेते धनंजय मोरे आणि दुधेबावीचे युवा नेते नाना आडके उपस्थित होते.

जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी कोळकी जिल्हा परिषद गटातील उर्वरित प्रश्न सोडवण्याची विनंती माजी खासदारांकडे केली. माणिकराव सोनवलकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पांडुरंग आडके, सुरेश चव्हाण, नवनाथ आडके, शंकर आडके, मंगेश आडके, ऋषिकेश आडके, देविदास मोरे, मयूर आडके, रवी आडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले. सरपंच बाळासाहेब शिंदे व धनंजय मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमास संदीप सोनवलकर, राजन खिलारे, यशवंत जाधव, प्रदिप भरते, किरण लाळगे, नितीन चतुरे, अभिजित चतुरे, सादिक शेख यांच्यासह सोनवडी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!