दैनिक स्थैर्य । दि. २६ मार्च २०२३ । बारामती । कोणताही न्यूडगंड न बाळगता व्यवसायाची सूक्ष्म माहिती घेऊन छोट्या व्यवसाय पासून सुरुवात करून यशस्वी मोठे उद्योजक व्हा नोकरी न मागता यशस्वी उद्योग व्यवसाय करून बेरोजगारांना रोजगार द्या असा असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त व्यवसाया साठी कर्ज योजनांची माहिती व नव उद्योजक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राजेंद्र कोंढरे मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. पांडुरंग जगताप, महिला जिल्हाध्यक्षा प्रियांका काटे, बारामती तालुका मराठा सेवा संघ अध्यक्ष नामदेवराव तुपे व बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व आदी मान्यवर,उद्योजक, लाभार्थी उपस्तीत होते.
महापुरुषाच्या जयंती डीजे, डॉल्बी लावून साजरी न करता सामाजिक कार्यातून साजरी करा, व्यवसायातील इतरांचा आदर्श घ्या बारकावे तपासा ,उद्योग व्यवसाय उभे करा परंतु जमिनी विकू नका, व्यवसायाची साखळी जोडा व एकमेकांना व्यवसाय व उद्योगात प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष सहकार्य करा ,मोबाईलचा वापर फक्त कामासाठी करा असेही राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून विविध व्यवसाय,उदयोग करण्यासाठी कर्ज घेतल्यावर वेळेत कर्ज फेडा व व्यवसायात भरारी घ्या तरच आर्थिक व सामाजिक पत सुधारणार असल्याचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी माने यांनी सांगितले. महिलांनी जिद्द, चिकाटी च्या जोरावर विविध व्यवसायात उतरून ते व्यवसाय यशस्वी केले असल्याने खऱ्या यशस्वी उद्योजिका झाल्याचे महिला अध्यक्षा अर्चना सातव यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले. ऍड प्रियांका काटे, धनंजय जामदार यांनीही मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक प्रतिनिधी म्हणून शोभाताई मांडके, संगीता चाळके, अभय तावरे यांनी अनुभव कथन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शिष्यवृत्ती योजना व नवीन व्यवसाय निवड साठी माहिती पुस्तके देऊन व मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले आभार गणेश काळे यांनी मानले.