माळजाई मंदिर परिसरात धारदार शस्त्राने मारहाण; एक गंभीर जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण |
माळजाई मंदिर परिसरात रस्त्यावर (फलटण, ता. फलटण) येथे दोघाजणांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी जीवे मारण्याची धमकी देऊन धारदार शस्त्राने एकावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याचे मित्रांनाही लाथाबुयांनी मारहाण करण्यात आली आहे. ही घटना दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी फलटण शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण कानिफ घोलप (रा. मंगळवार पेठ, फलटण) व यशराज कृष्णाजी पिसाळ (रा. कोळकी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांच नावे आहेत.

या घटनेची अधिक माहिती अशी, फिर्यादी राजरत्न जयवंत जगताप (वय २२, रा. लकडी बझारचे पाठीमागे, जाधववाडी, ता. फलटण) व त्याचे दोन मित्र हे दिनांक २६/१२/२०२३ रोजी रात्री ८.३० वा. चे सुमारास पूर्व बाजूस असले गेटमधून माळजाई मंदिराजवळ रस्त्यावर आले असताना करण कानीफ घोलप व यशराज श्रीकृष्ण पिसाळ हे दोघेजण मोटरसायकल वरून तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत धारदार शस्त्राने गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या एकास मित्रास लाथाबुयांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा तिसरा मित्र लपून बसला. त्यामुळे त्यास मारहाण झाली नाही. फिर्यादीने वरील आरोपींविरोधात जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) अतुल सबनीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!