
दैनिक स्थैर्य । दि. २० नोव्हेंबर २०२२ । सातारा । बहिणीशी प्रेम विवाह केला, याच्या रागातून मेव्हण्याने बहिणीच्या नवऱ्याला मारहाण केली. तसेच बहिण व आईलाही मारहाण करून जखमी केले. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी रात्री सवा आठच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात अजय देडगे (वय २४, रा. पंताचा गोट, सातारा) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंताचा गोट येथे राहत असलेले अजय देडगे यांनी व सुष्टी देडगे या दोघांनी प्रेम विवाह केला. यांचा राग मनात धरून अजयचा मेव्हणा शिवम पवार (वय २२) हा घरी गेला. यावेळी पंकज पवार (वय ३५), ऋषिकेष पवार (वय २६), संजय पवार (वय २८, सर्व रा. पंताचा गोट, सातारा) हे सोबत होते. त्यांनी अजयला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी सृष्टी व आई पौर्णिमा हिला ही मारहाण करून जखमी केले आहे. यामुळे या चौघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.