स्थैर्य, सातारा, दि. 18 : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अतीत(ता.सातारा) येथे युवकाला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.यामध्ये विक्रम अधिक यादव (वय.२७,रा.अतीत) हा युवक जखमी झाला असून बोरगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विक्रम यादव याची दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील युवकांशी भांडणे झाली होती.गुरुवारी सायंकाळी विक्रम यादव हा त्याच्या दुचाकीवरून गावातून जात असताना ऋषिकेश उर्फ गजानन दत्तात्रेय कारंडे,प्रशांत शशिकांत जगताप,योगेश उत्तम जगताप,दत्तात्रेय किसन कारंडे,शशिकांत रामचंद्र जगताप(सर्व.रा.अतीत.ता.सातारा) व योगेश माने (पूर्ण नाव माहीत नाही,रा.पाली, ता.कराड) यांनी त्याला कुऱ्हाड, लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण केली.यामध्ये विक्रम यादव जखमी झाला.उपचारानंतर त्याने बोरगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दत्तात्रेय किसन कारंडे व शशिकांत रामचंद्र जगताप यांना अटक केली असून पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.