ठेकेदारास मारहाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । सातारा । बहिणीचा पाठलाग करून तिची सारखी छेड काढतो अशी विचारणा करत दौलतनगर येथील एका ठेकेदारास मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोघांची नावे समजली असून अन्य पाचजणांचा शोध सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार रविवार, दि. २ रोजी दुपारी दीड ते सायंकाळी साडेसात या वेळेत घडला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुरज नामदेव पवार (वय ३०, रा. २६६, श्रीराम कॉलनी, दौलतनगर, करंजे, सातारा) हे ठेकेदार असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या राहत्या घराच्या गेटजवळ पृथ्वीराज गायकवाड, त्याचा भाऊ तसेच संकेत किर्दत आणि मुलीचे वडील, मुलीचा भाऊ व दोन अनोळखी इसम असे सातजण आले. त्यांनी सुरज याला तू माझ्या बहिणीची छेड काढतो, या कारणावरून चिडून जाऊन बेकायदा जमाव जमवत दमदाटी केली. यामध्ये पृथ्वीराज गायकवाडच्या भावाने सुरज यांच्या हातावर दगड फेकून मारला तर मुलीच्या भावाने त्याची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. पृथ्वीराजने सुरज यांच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करत दुखापत केली तसेच त्याच्या हातातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. याबाबतची तक्रार स्वराज यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल दिल्यानंतर सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी कोणालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, ज्यांनी सूरजला मारहाण केली त्यापैकी दोघांची नावे समजली असून बाकीच्या पाचजणांचा शोध सुरू आहे. अधिक तपास सहायायक फौजदार साबळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!