दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील महात्मा फुले चौकात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाचा राग मनात धरून एकास लाकडी दांडके व हाताने मारहाण करून शिवीगाळ केल्याची तक्रार फलटण शहर पोलिसात दाखल झाली आहे.
या मारहाण प्रकरणी श्रेयश संजय पवार (रा. पवारगल्ली, फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची अधिक माहिती अशी, महात्मा फुले चौाकत फिर्यादी अभिजीत जयवंत खराडे (वय ३१, रा. पवारगल्ली, फलटण) हा काल रात्री ११ वाजता पानटपरीवर तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला असता त्याच्या गल्लीतील श्रेयश संजय पवार याने मागील भांडणाचा राग मनात धरुन त्याच्या खिशात असलेला पेपर स्प्रे काढून फिर्यादीच्या तोंडावर मारून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दाखल झाली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. फौजदार भोसले करत आहेत.