चार गर्दुल्याकडून सफाई कर्मचऱ्यास मारहाण व वाहनाची तोडफोड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१३ फेब्रुवारी २०२१ । शिरवळ । एका वाईन शॉप शेजारी असणाऱ्या चायनीजच्या हॉटेललगत सफाई कर्मचाऱ्याला गांजा सारख्या मादक पदार्थाचे सेवन करून अडवून ,शिवीगाळ,दमदाटी करीत २ हजार रुपये रोख व दुचाकीसह अन्य वाहनांची तोडफोड दगडाने करून नुकसान केल्याप्रकरणी सराईत चार जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायद्यासहित विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील एका खाजगी कंपनीमध्ये सफाई कर्मचारी प्रकाश भानुदास तिबोटे (वय ४२,रा.केंजळ ता.भोर जि.पुणे) हे कंपनीमधील काम उरकून मोटारसायकल (क्र.एमएच-११-सिक्यू-८३६५) वरून शिरवळमध्ये किराणा व भाजीपाला घेऊन एका वाईन शॉपमधून दारू घेऊन चायनीज घेऊन मोटारसायकलजवळ आले असता त्याठिकाणी मादक पदार्थाचा सेवन केलेले आर्यन जाधव, अनिकेत कांबळे,संजय कोळी,रामा मंडलिक (चौघे रा. शिरवळ ता.खंडाळा) हे त्याठिकाणी आले. यावेळी संबंधितांनी प्रकाश तिबोटे यांना दारू व गांजा पिणेसाठी पैसे दे अशी म्हणताच प्रकाश तिबोटे यांनी पैसे नाहीत असे म्हणताच संबंधितांनी शिवीगाळ करून दमदाटी करीत खिशातील २ हजार रुपये रॉक रक्कम व मोटारसायकलची चावी जबरदस्तीने काढून घेत मोटारसायकलवर दगडफेक करीत मोटारसायकलची तोडफोड करीत मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावेळी संबंधितांनी आणखी खेर्रब महादेव देवकर यांच्या मालकीची कार (क्र.एमएच-११-सिक्यू-८३६५)तसेच नवनाथ शंकर शिंदे यांची कार (क्रं.एमएच-११वाय-४०५२)चेही मोठ्या प्रमाणात निक्सन करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला आर्यन जाधव, अनिकेत कांबळे,संजय कोळी,रामा मंडलिक यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणी आर्यन जाधव, अनिकेत कांबळे,संजय कोळी,रामा मंडलिक यांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सोमवार दि.१४ फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची फिर्याद प्रकाश तिबोटे यांनी दिली असून अधिक तपास शिरवळ पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!