स्थैर्य, सातारा, दि.११: कोंडवे, ता. सातारा येथे जमीन वाटपाच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अमोल प्रल्हाद भुजबळ, रा. कोंडवे, ता. सातारा असे संशयिताचे नाव आहे. याबाबत संदीप शंकर भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोंडवे येथे त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांचा चुलत भाऊ अमोल भुजबळे हा दारुच्या नशेत तेथे आला. त्याने संदीप भुजबळ यांना जमीन वाटपाच्या शिवीगाळ करून दांडक्याने डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. हा मार अडवताना फिर्यादी संदीप भुजबळ यांच्या हाताला जखम झाली आहे. याप्रकरणी हवालदार कदम तपास करत आहेत.