दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । फलटण । येथील विद्यानगर परिसरातील गणेश अपार्टमेंटमध्ये राहत असणार्या महेश बबन नखाते यांस पुर्वी पाणी भरण्याच्या झालेल्या वादामधुन कुर्हाडीने व खोर्याने मारहाण करून विक्रम चंद्रकांत शिंदे याने गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद अमेय प्रविण खलीपे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे. घटनास्थळी फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम चंद्रकांत शिंदे, रा. गणेश अपार्टमेंट, फलटण याने शिवीगाळ करत कुऱ्हाड अंगावर धावून जाऊन ती कुराड त्याचे आईने काढून घेतली व तेथेच पडलेले लोखंडी पात्याचे लाकडी दांडक्याचे खोऱ्याने आरोपी याने फिर्यादीचे डोक्यात वरील बाजूस जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केलेले आहे. विक्रम चंद्रकांत शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आलेली आहे व 5 दिवस पोलीस कस्टडी बजावण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ करित आहेत.