
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । फलटण । पिंप्रद, ता. फलटण येथील भारत पेट्रोलियम पंपावरून मारहाण करत 20 लाख रुपयांचे मशीन ट्रेलरमधून भरून नेल्याप्रकरणी बारामती येथील चोलामंडलम फायनान्स कंपनीच्या दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजाराम रावसाहेब जाचक (वय 25, रा.लासुर्णे, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. सागर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), धायगुडे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) व इतर अनोळखी पाच इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तपास सहायक फौजदार डी. डी. कदम करत आहेत.