कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा; यंत्रणा प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, बारामती, दि.२२: बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन यंत्रणा प्रभावीपणे राबवत, कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभावीपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका संभावतो आहे. त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यायबाबत कार्यवाही करावी. रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, बारामती तालुक्यातील सर्व रुग्णालयामध्ये फायर व ऑक्सिजन ऑडिट वेळेवर करुन घ्यावे, सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे. रुग्णालये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे, ही बाब दिलासादायक आहे. तथापि मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कोणत्याही रुग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अगोदरच नियोजन करुन ठेवावे, निधीची कमतरता पडू देणार नाही. म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी.


उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीपूर्वी मॅगनम इंटरप्राइजचे विकास सराफ , बारामती यांचे मार्फत अंगणवाडी सेविका व सर्वे करणाऱ्या पथकाला एन 95 व सर्जिकल मास्क, फेश शिल्ड, व सॅनिटायझर, फेरोरा इंडिया प्रा. लि., बारामती यांच्याकडून 100 बेड सेट व 20 ऑक्सिमीटर, डॉ. गौतम राजे, लंडन यांच्याकडून 12 स्ट्रेचर्स, व इंदू केअर फार्माचे डॉ. रामदास कुटे यांच्याकडून सिल्वर ज्यूबिली रुग्णालयास शतप्लस च्या 500 बॉटल (इम्यूनिटी डोस) व श्रीमती सुरिया अत्तार यांच्या कडून 10 हजार रूपयांचा धानादेश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूपूर्द करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!