दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । बारामती । व्यसन मुक्त झाल्याने कुटूंबाला व स्वतःला आनंद व समाधान मिळते त्याचा लाभ घेण्यासाठी व समाज्यच्या, देशाच्या भल्यासाठी व्यसन मुक्त व्हा असा संदेश युवा कीर्तनकार ह.भ.प शिवाजी महाराज शेळके यांनी दिला. अध्यात्मिक अनाथ वारकरी शिक्षण संस्था व व्यसनमुक्ती केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार 10 व रविवार 11सप्टेंबर रोजी व्यसन मुक्ती, व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून जवळपास 110 तरुणांना दारूचे व्यसन पासून मुक्त करण्यात आले.
या प्रसंगी युवा कीर्तनकार शिवाजी महाराज शेळके व गणेश वाघले यांच्या मुलींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ‘ या विषयावर उपस्तित यांना मार्गदर्शन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व्यसन मुक्ती शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी अनिल गायकवाड, भानुदास हिंगणे, कीर्तनकार छगन खडके महाराज,अमोल सूळ, गणेश अडागळे, सुधाकर क्षीरसागर, भारुडकर बालाजी शिरसट, व सुमित जानकार, मयूर कुंभार, प्रेम पवार, मयूर वाल्मिकी, रोहित जाधव,, चौधरी सर, मोरेश्वर खलाटे, बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्तित होते. व्यसन मुक्ती करणाऱ्या तरुणाचा सन्मान करून त्यांच्या पत्नीचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
“भारत देश व्यसन मुक्त झाला पाहिजे शासनाने साथ नाही दिली तरी प्रबोधन च्या माध्यमातून तरुणाने व्यसनी होऊ नये म्हणून व जर व्यसनी असतील तर व्यसनापासून त्यांना मुक्त करण्यासाठी जीवनभर कटिबद्ध राहू “अशी माहिती युवा कीर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांनी दिली. या प्रसंगी प्रबोधन करणाऱ्या साठी सहकार्य करणारे ढोलकी वादक, बुलबुल वादक, मृदूंग वादक, विना वादक यांचा सन्मान करण्यात आला.