
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । फलटण । सुमारे दोन वर्षांपासून आपण सर्व जण एकत्रित कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहोत. समाधानाची बाब म्हणजे यामध्ये आपण काही अंशी यशस्वी झालेलो आहोत. कोरोनासाठी अजुनही आपल्याला सतर्क रहावे लागणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करित कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी; ह्याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील, असे मत महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
या महामारीमध्ये आपण अनेक जिवलगांनो मुकलेलो आहोत. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. यासोबतच व्यक्तीश: माझ्या कुटुंबात सुध्दा दुःखद घटना घडलेल्या आहेत. या सर्व प्राश्वभुमीवर उद्या शनिवार दि. ०९ ऑक्टोबर रोजी साजरा होणारा वाढदिवस साजरा करणार नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जेथे असाल तिथूनच मला आशिर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. प्रशासनाने घालुन दिलेल्यी नियमांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.