
स्थैर्य, दि.१९: आजपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या सीजनमध्ये बीसीसीआयने स्टेडियममध्ये मीडियाला परवानगी नाकारली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभुमीवर लावलेल्या कडक आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉलमुळे मीडियाला स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी रात्री बीसीसीआयने गाइडलाइन जारी केली. आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना शनिवार(दि.19) संध्याकाळी 7:30 वाजता गतविजेत्या मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान होत आहे.
या सीजनमध्ये फ्रेंचाइजीला सामन्यापूर्वी पत्रकार परिषद करण्याची गरज नसेल. परंतू, सामना झाल्यानंर व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेतली जाईल.
स्टेडियममध्ये नो एंट्री
बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, ‘ड्रीम-11 इंडियन प्रीमियर लीग 2020 कोविड-19 महामारीमुळे यूएईत बंद स्टेडियममध्ये आयोजित केली जात आहे. आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलमुळे मीडियाला सामना किंवा संघाचा अभ्यास सत्र कव्हर करण्यासाठी स्टेडियमच्या आत जाण्याची परवानगी नसेल.