
दैनिक स्थैर्य । दि. १० फेब्रुवारी २०२१ । फलटण । युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुधोजी क्लबच्या प्रांगणामध्ये राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी पासुन करण्यात आलेले आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
स्पर्धेमध्ये विजेत्यास प्रथम पारितोषिक म्हणून २१ हजार रुपये व पारितोषिक, द्वितीय क्रमांकास १५ हजार व पारितोषिक, तृतीय क्रमांकास ११ हजार व पारितोषिक मिळणार आहेत.
या स्पर्धेसाठी राज्य खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सॅटेलाईट रोटरी क्लब, फलटणचे अध्यक्ष श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अजयसिंहराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती राहणार आहे.