बारामतीची सुप्रसिद्ध ‘शकुंतला रबडी मस्तानी’ आता फलटणमध्ये

कोळकी येथे नव्या शाखेचा शुभारंभ; १२ फ्लेवर्समध्ये कुल्फीही उपलब्ध


स्थैर्य, फलटण : बारामतीची ओळख बनलेली सुप्रसिद्ध ‘शकुंतला रबडी मस्तानी’ आता फलटणकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. अस्सल पारंपारिक चवीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या रबडी मस्तानीच्या नव्या शाखेचा शुभारंभ कोळकी येथील शिंगणापूर रोडवर, सावतामाळी नगर येथे झाला आहे.

‘शकुंतला रबडी मस्तानी’ हे शुद्ध दुधाच्या पदार्थांपासून बनवलेल्या मधुर मस्तानीसाठी प्रसिद्ध आहे. येथे उपवासाच्या मस्तानीसह अनेक फ्लेवर्सची रबडी मस्तानी उपलब्ध आहे. यासोबतच, १२ पेक्षा जास्त फ्लेवर्समध्ये स्वादिष्ट आणि नैसर्गिक चवीची कुल्फी, तसेच प्युअर दुधापासून बनवलेले आईस्क्रीम हे देखील येथील वैशिष्ट्य आहे.

या नव्या दालनामुळे फलटणमधील खवय्यांना एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. येथे विविध शुभकार्यांसाठी आणि पार्ट्यांसाठी ऑर्डरही स्वीकारल्या जातील, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!