बारामतीच्या बालकल्याण केंद्राची वरदा कुलकर्णी राज्यात जलतरण स्पर्धेत प्रथम


दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । बारामती । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा २०२३ या श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम म्हाळुंगे बालेवाडी येथे दिनांक १४ फेब्रुवारी ते ते १६ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये कुमारी वरदा संतोष कुलकर्णी हिने जलतरण स्पर्धेमध्ये १७ ते २१ या वयोगटामध्ये पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले .

५० मीटर जलतरण स्पर्धेत तिने १७ ते २१ या वयोगटामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमक मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली.
राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी झालेली आहे. या स्पर्धेसाठी ३६ जिल्ह्यातून जवळजवळ २५०० हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. वरदा कुलकर्णी ही बारामती येथील बालकल्याण केंद्राची विद्यार्थिनी असून ती वीर सावरकर जलतरण तलाव येथे जलतरण प्रशिक्षक सुभाष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

वरदा कुलकर्णी हिने यापूर्वी विविध स्पर्धे मध्ये यश मिळवले आहे. बालकल्याण केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अनिल मोकाशी सचिव महेश मुळीक खजिनदार माधुरी मोकाशी व मुख्याध्यापक व्ही. एन.कांबळे क्रीडा शिक्षक परेश चन्ना , सुनील भुजबळ यांनी तिला सहकार्य केले आहे.


Back to top button
Don`t copy text!