
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । बारामती । बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 च्या अध्यक्षस्थानी डॉ.निलमकुमार शिरकांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याच बरोबर उपाध्यक्षपदी डॉ.राहुल शिंगाटे व डॉ अर्चना सोनवणे ,सचिवपदी डॉ राकेश मेहता व डॉ अमोल जगताप तर खजिनदार पदी डॉ नितीन पाटील व डॉ अमित भापकर यांची निवड करण्यात आली .यावेळी मेडिकोज गिल्ड बारमती येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ शेखर शाह (अध्यक्ष मेडिकोज गिल्ड बारमती ) तसेच प्रमुख पाहुने म्हणून डॉ सचिन बालगुडे (अध्यक्ष बारमती तालुका राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ) व इतर मान्यवर व तालुक्यातील समस्त डॉक्टर गण उपस्थीत होते .यावेळी बारामति तसेच सभोवतालच्या भागातील डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटना वृद्धिसाठी आम्ही कटिबद्व आहोत असे नवनिवार्चित अध्यक्ष डॉ नीलमकुमार शिरकांडे यांनी सांगितले .बारामती तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन 2023-24 कार्यकरणी पुढील प्रमाणे अध्यक्ष – डॉ नीलमकुमार शिरकांडे
उपाध्यक्ष – डॉ राहुल शिंगाटे ,डॉ अर्चना सोनवणे
सचिव – डॉ राकेश मेहता ,डॉ अमोल जगताप
खजिनदार – डॉ नितिन बेलदार पाटिल ,डॉ अमित गोरख भापकर
इतर समित्या – क्रीड़ा समीती -डॉ तेजस खटके ,डॉ जीवन कोकरे ,डॉ सचिन लोनकर ,डॉ रुपेश माने सांसकृतिक समिति -डॉ महावीरसंचेति डॉ सागर साळुंखे